चिखली,दि.२३ ( punetoday9news ):- प्रभाग क्र. १, चिखली येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रं . ०१ चिखली येथे  महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली या ठिकाणी चालू अमलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली .

सदर ठिकाणी एकूण ०५ अनधिकृत बांधकामावरील एकूण २ ९ ४८.२४ चौ.फुट ( २७४.०० चौ.मी. ) क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली . सदर कारवाई अतिरीक्त आयुक्त  अजित पवार , सहशहर अभियंता  मकरंद निकम यांचे मार्गदर्शनाखाली , कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली व उपअभियंता  मुधिर मोरे तमेच  विश्वनाथ राऊत व  रविंद्र भोकरे कनिष्ठ अभियंता , बीट निरीक्षक ०५ तसेच महापालिका अतिक्रमण पथक , जे.सी.बी. – २ व मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात आली .

Comments are closed

error: Content is protected !!