दिल्ली,दि.२३( punetoday9news ):- प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, आता एक थ्री व्हीलर इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली असून या कारसाठी बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
Strom मोटर्स ने भारतात त्यांची ऑल-इलेक्ट्रिक R3 थ्री-व्हीलरसाठी 10,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुकिंग सुरु केलं आहे. या वाहनाला कंपनीने स्पोर्टी लुक प्रदान केला आहे. या कारमध्ये 2-सीटर केबिन असून ज्यामध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. ही कार 80kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 200 किमीपर्यंतचा प्रवास करते. Strom R3 चं डिझाईन खूपच वेगळं आणि दमदार आहे. या कारमध्ये कंपनीने छोटं बोनट, मोठं ब्लॅकआउट ग्रील ज्यामध्ये हेडलाइट्स वाईड एयर ड्रॅम देण्यात आले आहेत.
Comments are closed