सांगवी,दि.२३(punetoday9news):- महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या सांगवी शाखेच्या सदस्यपदी सतपाल ढोरे यांची निवड करण्यात आली. देहू देवस्थान ट्रस्टचे हभप शिवाजी मोरे व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
जुनी सांगवी येथील मारुती मंदिर ट्रस्टचे कार्यध्यक्ष सतपाल ढोरे हे १० वर्षे पासून कार्यरत आहेत. राममंदिर जीर्णोद्धार, वेताळ महाराज मंदिर उभारणी, दत्त मंदिराचे सुशोभिकरणामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. शहरामध्ये वारकरी भवन उभारण्याचा मानस ढोरे यांनी व्यक्त केला.
Comments are closed