• जितो च्या माध्यमातून पारिवारिक क्रिकेट सामन्याचे चौथे वर्ष.

• पुरुष गटात यश कुंकुलोळ व महिला गटात प्रेक्षा लुंकड मालिकावीर .

• अभिजित पंढारे व स्विटी जैन उत्कृष्ठ फलंदाज.

• भाग्येश लुनावत व दिया कांकरिया उत्कृष्ठ गोलंदाज.

 

चिंचवड,दि. २४(punetoday9news):-  जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाझेशन (जितो) आयोजित मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांत गोल्डन आर्म संघाने हिट अँड रन संघावर रोमहर्षक विजय मिळवीत यंदाच्या ‘ जितो चषकावर ‘आपले नाव कोरले.अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले होते.महिला व पुरुष यांनी एकत्र खेळत या समान्यांचा आनंद लुटला.महिलांच्या सामन्यात ग्राऊंड ब्रेकर संघ विजयी ठरला. तर पिच स्मॅशर संघ उपविजेता ठरला.


खेळाच्या माध्यमातून प्रत्येकाचे ऋणानुबंध घट्ट व्हावेत व पारिवारिक जिव्हाळा निर्माण व्हावा या साठी जितो च्या माध्यमातून विविध खेळांचे आयोजन करण्यात येते.पारिवारिक क्रिकेट सामन्याचे हे चौथे वर्ष होते.विविध वयोगटातील सभासदांनी एकत्र येत या खेळाचा आनंद लुटला.
अंतिम सामन्यात गोल्डन आर्म संघासमोर ६५ धावांचे लक्ष होते.शेवटच्या षटकात ११ धावांची आवश्यकता असताना मटीज जैन याने उत्कृष्ट खेळी करत सामना खेचून आणला.महाराष्ट्र रिजन चे खजिनदार राजेंद्र जैन,चिंचवड-पिंपरी जितो चे अध्यक्ष संतोष धोका,सेक्रेटरी नेमीचंद ठोले यांच्या हस्ते विजयी संघाला २१ हजारांचे पारितोषिक व ‘जितो करंडक’देण्यात आला.उपविजेता संघ हिट अँड रन १५ हजार व करंडक व तृतीय स्थानी असणाऱ्या हिट मशीन संघाला ११ हजार रुपये व करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरुष गटात यश कुंकुलोळ व महिला गटात प्रेक्षा लुंकड मालिकावीर ठरले.अभिजित पंढारे व स्विटी जैन उत्कृष्ठ फलंदाज ठरले.भाग्येश लुनावत व दिया कांकरिया यांनी उत्कृष्ठ गोलंदाज किताब मिळविला.

महिला गटात पायल चुत्तर मालिकावीर ठरली,आरती मुथा उत्कृष्ठ गोलंदाज व स्विटी जैन उत्कृष्ठ फलंदाज ठरल्या.विजेत्या संघाचे प्रायोजक रुणाल ग्रुप व उपविजेत्या संघाचे दिलीप सोनिगरा व तृतीय संघाचे नवकार ग्रुप हे प्रायोजक होते.तीन दिवस रंगलेल्या या सामन्यांत महिला संघासह २० संघांच्या खेळाडूंनी खेळाचा आनंद लुटला.जितो एक परिवार आहे.खेळाच्या माध्यमातून एकत्रित येत ऋणानुबंध घट्ट व्हावेत या साठी आयोजन केल्याचे अध्यक्ष संतोष धोका यांनी सांगितले. संकेत जैन, चिराग चोरडिया सह युवा ग्रुप व महिला ग्रुप च्या सभासदांनी स्पर्धेसाठी योगदान दिले.
या प्रसंगी युवा व महिलांसाठी विविध क्षेत्रात विशेष संधी जितो ने उपलब्ध केल्याचे धोका व जैन यांनी सांगितले.  महिला अध्यक्षा तृप्ती कर्नावट सेक्रेटरी पूनम बंब व खजिनदार अर्चना चोरडिया यांनी महिला गटातील क्रिकेट सामन्याचे आयोजन केले.

Comments are closed

error: Content is protected !!