• कोयता, पिस्तुल घेवून गुंडांचा नाच ; पोलिसांचा धाक राहिला नाही की दुर्लक्ष असा नागरिकांकडून सवाल उपस्थित. 

पुणे,दि. २४( punetoday9news):- पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात नव्हे येथील शिवजयंती दिवशी एका तडीपार गुंडाने हातात चक्क कोयता घेऊन नाच केला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समोर आला आहे. तोपर्यंत तो पोलिसांना समजला नाही का ? असा नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. 

रोशन लोखंडे हा तडीपार गुंड असून त्याच्याविरुद्ध शस्त्रे  जवळ बाळगणे , दरोडा , आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत . विशेष बाब म्हणजे त्याला तडीपार करण्याची ही दुसरी वेळ आहे .

विशेष म्हणजे रोशनसोबत नाचणाऱ्या एका गुंडाच्या हातात पिस्तुलही दिसत आहे. या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार असणारे गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे माहित असूनही पोलीस दुर्लक्ष करीत आहेत का? असेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.

पुर्वी तडिपारीच्या नावाने गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होत असे . पण आता हे चित्र पाहून तडीपार गुंड हे इतर गुंडांसाठी जणू आदर्शच असल्याचे भासत आहे. त्यामुळे वेळीच याला आवर घालणे आवश्यक आहे अन्यथा कायदा व सुव्यवस्था हे फक्त कागदोपत्री उरतील.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!