पुणे,दि. २५(punetoday9news):-  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना सरकार आणि पालकांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे.

वाशिम जिल्ह्यातील निवासी शाळेत 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात 42 विद्यार्थी आणि 8 शालेय कर्मचारी अशी 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतही 23 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या देगाव निवासी शाळेत 229 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 2 दिवसात कोव्हिड-19 पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत.

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रकृतीवर लक्ष ठरवण्यासाठी दोन डॉक्टरांसह आरोग्य पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!