पिंपरी, २६(punetoday9news):- सफाई कर्मचा-यांसाठी महानगरपालिकेने अधिकाधिक योजना राबवून त्यांचे आयुष्य उज्वल होईल यासाठी प्रयत्न करावे अशी सुचना भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव नरेन दास यांनी केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिल्लीवरुन आलेल्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. सचिव नरेन दास यांच्यासोबत आयोगाचे सल्लागार पुरम सिंग होते. या आयोगाने महापालिकेतील सफाई कर्मचा-यांच्याबाबतीत असलेल्या विविध विषयांचा आढावा घेतला. सफाई कर्मचा-यांना वेळेत वेतन अदा झाले पाहिजे, त्यांच्या तक्रारींना प्राध्यान्य देऊन त्यावेळेत सोडविल्या गेल्या पाहिजे, सफाई कर्मचा-यांची भरती प्राधान्याने केली पाहिजे. घरकुल योजनांमध्ये या कर्मचा-यांना घरे देण्याबाबत मनपाने पुढाकार घेतला पाहिजे, अशा विविध सुचना आयोगाचे सचिव नरेन दास यांनी केल्या.
प्रारंभी या शिष्टमंडळाचे स्वागत आयुक्त राजेश पाटील आणि उपमहापौर केशव घोळवे यांनी केले. यावेळी नगरसदस्य माऊली थोरात, नगरसदस्या योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, उप आयुक्त सुभाष इंगळे, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, राजेश आगळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे आदी उपस्थित होते.
यानंतर झालेल्या बैठकीमध्ये आयोगाने सफाई कर्मचा-यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला, तसेच विविध संघटनांकडून प्राप्त झालेल्या सुचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
Comments are closed