पिंपरी,दि.२६(punetoday9news):- शिवसेना महिला आघाडीच्या विभागीय संघटीका मंदा फड यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे कोरोना लसीकरण नियोजनाची माहिती पालिकेच्या संकेतस्थळ, प्रसार माध्यम व वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक लसीकरण मोहिमेबद्दल की केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १ मार्च पासून ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षां वरील गंभीर आजाराने त्रस्त लाभार्थ्यांना लसीकरण करण्याबाबत जाहीर केले आहे .
त्यात संपूर्ण देशात १०हजार सरकारी व २०हजार खाजगी रुग्णालयांना परवानगी दिल्याचे स्पष्ट केले आहे . या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणत्या खाजगी रुग्णालयांना परवानगी मिळाली असून कोणत्या सरकारी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण करण्यात येईल तसेच या लसीकरणासाठी नावनोंदणीची प्रक्रिया या बाबत संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या पोर्टलवर तसेच वृत्तपत्रांमध्ये किंबहुना खाजगी होर्डिंग वर प्रसिद्ध करावी जेणेकरून हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लसीकरण करणे सोपे जाईल. अन्यथा फक्त सरकारी रुग्णालयांंमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण याबाबतची माहिती त्वरित प्रसारित करावी.
जाहिरात:-
Comments are closed