जेजुरी,दि.२६( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील जेजुरीमधील खंडोबा मंदिर माघी पोर्णिमा शिखर काठी यात्रेवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २६ फेब्रुवारी ते दिनांक २८ फेब्रुवारी  रोजी जेजुरी बंद (संचारबंदी) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

दरवर्षी माघी पोर्णिमा शिखर काठी यात्रेवेळी जेजुरी शहरात संगमनेर होलम राजा , सुपे खैरे पडळ ता . बारामती , जेजुरी येथील होळकर या तीन मानाच्या काठया व इतर २०-२५ शिखर काठया तसेच कोकण विभाग , नाशिक विभाग येथील पालख्या येत असतात. मात्र यंदा कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता  शिखर काठी व पालख्या जेजुरीत आण्ण्यास बंंदी घालण्यात आली आहे.

याचबरोबर जेजुरी शहरात बाहेरुन आलेल्या कोणत्याही भाविकासाठी हॉटेल, लॉजेसवर मुक्कामासाठी ठेवता येणार नाही . पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रम , सवाध्द मिरवणुका , पालख्या काठी मिरवणुक काढता येणार नाही. कोणत्याही रस्त्यावर , सार्वजनिक वाहतुकीने गल्लोगल्ली इ . ठिकाणी संचार , वाहतूक , फिरणे , उभे राहणे , थांबून राहणे , रेंगाळणे असे सर्व कृत्य मनाई करण्यात आले आहे.

मानाच्या शिखर काठया जेजुरी शहरात दाखल होत असल्यामुळे त्यादिवशी मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी गर्दी होवून कोरोना संसर्ग व फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे  सर्व बाबींचा विचार करुन कायदा व सुव्यवस्था राखणेच्या व कोरोनाचा संसर्ग रोखणेच्या दृष्टीने संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर आदेश पोलीस , आरोग्य , अत्यावश्यक सेवा ( उदा . वीज , पाणी पुरवठा , संपर्क , माहीती व तंत्रज्ञान सेवा ) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासासाठी संबंधीत उद्योग सीएनआय , अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक , कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार टाळणेसाठी कार्यरत संबंधीत निवारण व्यवस्थापन यामधील अधिकारी व कर्मचारी यांना लागू नसतील मात्र त्यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणुकीचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असेल.

जाहिरातः-

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!