बालेवाडी, दि. २८( punetoday9news):- महाळुंगे (क्रीडानगरी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४४ व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच मयुर भांडे, माजी उपसरपंच विवेक खैरे, माजी उपसरपंच रुपेश पाडाळे, सदस्य अजिंक्य निकाळजे, चर्मकार विकास संघ जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत आबणे, आर.एस.सी.एस शिवाजीनगर विभाग अध्यक्ष निलेश गायकवाड, प्रदेशाध्यक्ष रोहित तिखे, बाळासाहेब तुपे, शरद शेडगे, निलेश भ. गायकवाड, मयुर वेताळ, प्रतीक शिंदे, ओम गायकवाड, रोहन गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती माघ पौर्णिमा निमित्त उत्साहात साजरी करण्यात आली. यामुळे संत रविदास महाराज यांचा समतेचा संदेश, विचार सर्व समाजात पसरण्यास मदत होईल.
Comments are closed