पुणे,दि.१ ( punetoday9news):- जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अभियान कालावधीत झालेल्या मृद व जलसंधारण कामांची खुली चौकशी करण्यासाठी शासननिर्णय दि . १ डिसेंबर २०२० अन्वये विजयकुमार सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली खुली चौकशी समिती गठीत सदर समितीमार्फत पुणे जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील तक्रारीचा आढावा व तक्रारदारांना समक्ष निवेदन मांडणेसाठी दि . ०२/०३/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय आयोजीत करण्यात आलेली आहे .
यास्तव जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील दि . ३१ मार्च २०२० पुर्वी सादर केलेल्या तक्रारी संदर्भात तक्रारदारांनी आपले निवदेन मांडणेसाठी आवश्यक त्या कागदपत्रासह समक्ष उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे यांनी केले आहे .
Comments are closed