राहू,दि.१( punetoday9news):- राहू चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राहू येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संत रविदास महाराज यांचा समतेचा संदेश, विचार सर्व समाजासाठी आज आत्मसात करण्याची गरज आहे .

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी आबा सोनवणे, सरपंच दिलीप देशमुख, माजी पोलीस अधिकारी अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बापू कदम या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

या प्रसंगी चर्मकार विकास संघ, राहू बेट अध्यक्ष अभिजित आबणे, अशोक आबनावे, डॉ. प्रविण गजरे, हरिश्चंद्र कदम, नवनाथ गाडेकर, मच्छिंद्र गजरे, संकेत आबणे, शशिकला आबणे तसेच ग्रामस्थ व समाजबांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन चर्मकार विकास संघ, शिक्षक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. प्रशांत आबणे यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती माघ पौर्णिमा निमित्त साजरी करण्यात आली.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!