सांगवी,दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सांगवी परिसरातील मुळा नदी लगत असलेल्या मलनिस्सारण पाईप लाईन मधून गेली अनेक दिवस मुळा नदी मध्ये थेट पाणी सोडले जात असून या गंभीर अवस्थेकडे महानगर पालिका प्रशासनाचे लक्ष नाही व याबाबत  प्रशांत शितोळे,कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस,पिंपरी-चिंचवड  यांनी विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ,पुणे यांंच्याकडेे तक्रार केली आहे. 

सांगवी परिसरातील मधुबन या ठिकाणी मुळा नदीचे पात्र असून लगतच संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे याच संरक्षण भिंतीच्या आडून सांगवी भागातला मैला व सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत लाईन असून यावर कोणाचेही लक्ष नसल्याने या लाईन मधून थेट नदीपात्रात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने मुळा नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे सांगवी भागात सध्या मच्छरांचे प्रमाण वाढले आहे व नागरिकांच्या आरोग्यास देखील यामुळे धोका संभवत आहे त्यामुळे अनेक रोगराईचे आजारास निमंत्रण देण्याचाच हा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले आहे .

काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने अशा प्रकारेच पर्यावरणास हानी होत असलेल्या कामाबाबत दंड ठोठावला आहे. तरीदेखील नागरिकांच्या जिवाची पर्वा न करता दुर्लक्ष करून महानगरपालिका त्याच पद्धतीची प्रदूषित परिस्थिती ठेवत आहे.

तसेच आपल्या विभागाकडून या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून कोणाच्या चुकीमुळे नदीपात्रात सांडपाणी व मैला पाणी सोडण्यात येते याबाबतची चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!