पिंपरी,दि.१( punetoday9news):- शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. पण त्याच मुकादमांकडे समाज आणि प्रशासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना दिले जाणारे स्थान हे कशा प्रकारचे असते हे सर्वश्रुत आहे. त्या पद्धतीला फाटा देत एक आदर्श उदाहरण लोणावळ्यात पहायला मिळाले आहे. लोणावळ्यात मुकादमांना फ्लेक्स वर स्थान देण्यात आले आहे त्यामुळे मुकादमांचा चेहरा जनतेला समजण्यासाठी मदत झालीच शिवाय कामांच्या दर्जातही चांगलीच सुधारणा झाल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे अशा पद्धतीचा उपक्रम जिल्ह्यातील इतर नगरपालिका व ग्रामपंचायतीतही राबवावा असे नागरिक बोलत आहेत या ठिकाणी बऱ्याच वेळा कंत्राटदार, मुकादम यांची माहिती लोकांना मिळतच नाही किंवा कागदोपत्री असलेली माहिती व प्रत्यक्ष काम करणारी व्यक्ती यांच्यातही कित्येकदा तफावत पहायला मिळते. त्यामुळे फ्लेक्स वर फोटो सहित मुकादम व कंत्राटाची संपर्कासहित पूर्ण माहिती लावली गेल्यास लोकांना प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळेल तसेच छोट्या-मोठ्या समस्येसाठी पटकन दिलेल्या संपर्क क्रमांकावरून संपर्क साधून परिसरातील कामेही होतील असे बोलले जात आहे.
Comments are closed