पिंपरी,दि.२( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विजय कांबळे व सहकारी  यांच्या तर्फे अनोखे अभिवादन केले जाते.

१४ एप्रिल रोजी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वही पेन संकलन व वितरण असे अभियान मागील ४वर्षे राबवले जाते.

जमा झालेल्या वह्या व पेन महाराष्ट्रातील शेतकरी, वंचित, गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना याचे वाटप केले जाते. या वह्यांचे वाटप आता पर्यंत २६ तालुक्यात केले असुन या १४ एप्रिल ला पुन्हा वही पेन संकलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या संकलनाच्या बाबतीत पिंपरी येथे मिंटिग संपन्न झाली असून ५०,००० वह्या विविध विहार, वस्ती व भिम अनुयायी सर्व समाजाकडून अभिवादन स्वरुपात संकलनाचा मानस ठरला आहे.

या वर्षीच्या या अभियानाकरीता चळवळीतील जेष्ठ उपासक संजय उबाळे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

 

Comments are closed

error: Content is protected !!