पहाडीआवाज, नर्मविनोद, सुसूत्रता व अभ्यासपूर्ण मांडणीने उपस्थित लोकांची वाहवा.
करमाळा,दि.२ (punetoday9news):- करमाळा तालुक्यातील लव्हे येथे शिवजयंती निमित्त छत्रपती युवा प्रतिष्ठाण व लव्हे ग्रामस्थांच्या वतीने व्याख्याते संपत गारगोटे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी माँ शरदाश्रमचे आनंदयोगी महाराज, पंचायत समितीचे सदस्य व सरपंच विलास पाटील, पंचायत समितीचे सदस्य अतुल पाटील, नेते राजू पाटील, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, सामाजिक कार्यकर्ते नागेश कांबळे, सत्यम सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे भाऊसाहेब साबळे, नेते माणिक पाटील, शेटफळचे सरपंच विकास गुंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच मान्यवरांना पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. प्रथम साक्षी बाळू खबाले हिने उपस्थित जनसमुदायापुढे आपले विचार व्यक्त केले. मुख्य व्याख्यानाच्या प्रारंभी युवा वक्ते बाळासाहेब तोरमल यांनी आपल्या पहाडी आवाजात शिव विचार मांडले. त्यांनी साध्य स्थितीवर मार्मिक विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली. त्यांनंतर खास पुण्यावरून आलेले व्याख्याते संपत गारगोटे यांनी जोरदार व्याख्यान सादर केले. ते म्हणाले, शिवराय हे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन जगलो पाहिजे आणि या देशात शिवराज्य निर्माण झाले पाहिजे मात्र या साठी देशातील राजकीय घराणेशाही उखडून फेकली पाहिजे. या व्याख्यानात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. व सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारा अंगिकारल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे सांगितले. आपला पहाडीआवाज, नर्मविनोद, सुसूत्रता व अभ्यासपूर्ण मांडणी या मुळे वक्त्याने उपस्थिती लोकांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर वलटे यांनी केले.
Comments are closed