पिंपरी,दि.२( punetoday9news):-  वाहतुकीचे नियम पाळण्याचा सूचक संदेश देणारा ‘आय ओपनर’ लघुपट नुकताच युट्युबवर व फेसबूक पेज वर प्रदर्शित झाला आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते या ‘आय ओपनर’ लघुपट प्रदर्शित करण्यात आला. सोशल माध्यमांवर या लघुपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

रेडबड मोशन पिक्चर या युट्युब चॅनलने  Addiction vs Attachment आणि Boycott Stress ह्या दोन सामाजिक संदेश देणाऱ्या हिंदी शॉर्ट फिल्म पासून सुरुवात केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा सीए अरविंद भोसले यांनी सामाजिक जाणिवेतून वाहतुकीचे नियम पाळण्या संदर्भातील ‘आय ओपनर’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. आय ओपनर या लघुपटामध्ये प्रसाद खैरे, आणि सागर कटके यांनी  अंध व्यक्तींचा उत्कृष्ट अभिनय सादर करीत वाहतुकीचे नियम पाळा या संदर्भातील  मार्मिक संदेश दिला आहे. हा लघुपट वाहतूक नियमावर आधारित असून वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे रस्त्यावरील होणारे अपघात व नियम याचा साधर्म्य मांडण्याचा या लघूपटाद्वारे प्रयत्न केला आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘आय ओपनर’ लघुपटाला शुभेच्छा देत लघुपटातील बारकावे एकूण विषयाच्या मांडणीचे व अभिनयाची त्यांनी विशेष कौतुक केले आणि सर्व टीम ला शूभेच्छा दिल्या. वाहतुकीचे नियम पाळणे  हे आपणा सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले.

आय ओपनर या लघुपटामध्ये  प्रसाद खैरे, चिराग चौधरी, सागर कटके, रोहित पवार अभिनय केला आहे. निर्माता प्रमोद अरबुज, एडिटर आणि छायांकन युसूफअली शेख, दिग्दर्शन सीए अरविंद भोसले यांनी केले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!