पुणे, दि.३( punetoday9news):-  डेक्कन आणि हांडेवाडीतील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी खेरीज अन्य वाहनांसाठी पार्कींग व वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार डेक्कन येथील व्हिनेस लेन मधील उपलेन कॅप्टन विवेक घाटपांडे पथ आणि हॉटेल गुडलक लेन (गुडलक हॉटेल ते सुवर्ण स्मृती मंगल कार्यालय मेन गेट पर्यंत रस्त्याचे) दोन्ही बाजूला नो पार्कींग करण्यात आली आहे. यापूर्वी याठिकाणचे पार्कींगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात यावेत.
तसेच हांडेवाडी येथील सय्यदनगर रेल्वे गेट ते अमर स्वीट चौक पर्यंत आणि वाडकरमळा ते सय्यदनगर रेल्वे गेट भुयारी मार्ग येथे एकेरी वाहतूक करण्यात येत आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जाहिरात:-

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!