फलटण,दि.३( punetoday9news):- सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथील गावात चोरट्यांनी चक्क पेट्रोलची पाईपलाईनच फोडल्याचे समोर आले आहे .त्यामुळे परिसरात पेट्रोलचा वास पसरला आहे त्याचबरोबर हजारो लिटर पेट्रोल जमीनीत झिरपल्याने विहीरीतील पाण्यावर पेट्रोलचा तवंग पसरला आहे.
एकीकडे पॅट्रोलचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र चोरट्यांनी अशा फिल्मी स्टाईलने केलेली चोरी म्हणजे पोलिसांना दिलेले आव्हान व सरकारला वाढत्या महागाईचा इशारा मानण्यात येत आहे. साताऱ्यातील सासवड येथे ही घटना मागील आठवड्यात घडली असून घटणेचे गांभीर्य लक्षात घेता ती गोपनीय ठेवण्यात आली होती . हिंदुस्तान पेट्रोल लिमिटेडने मुंबई ते सोलापूर अशी पेट्रोलची पाईपलाईन केली आहे . ही पाईपलाईन साताऱ्यातील फलटण तालुक्यातील सासवड आदर्की अशा डोंगराळ भागातून नेण्यात आली आहे. याच संधीचा फायदा चोरट्यांनी साधत ही पेट्रोलची पाईपलाईनच फोडली मात्र त्यांना परत ती बंद करता न आल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेट्रोल वाहून गेले.
संपूर्ण शेतीही पेट्रोलने भिजल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची पिकेही जळून गेली असून गहु , बाजरी , मका या सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केली आहे .
या बाबत हिदुस्तान पॅट्रोलियम कडून लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जाहिरात:-
Comments are closed