दापोडी,दि.३( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडीतील पवना नदी, मुळामुठा नदी मध्ये वाढत्या जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

फुगेवाडी ,दापोडी, कासारवाडी परिसरात धूर फवारणी व औषध फवारणी करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यात यावा व नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका स्वाती माई काटे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

तसेच पवना नदीमधील वाढलेली जलपर्णी त्वरित काढून टाकण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आले असल्याची माहिती शेखर काटे. अध्यक्ष-पिंपरी विधानसभा यांनी दिली आहे .

 

जाहिरात:-

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!