पुणे,दि.३( punetoday9news):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत घेण्यात येणा-या शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती(लायसन) करीता मार्च महिन्यातील प्रत्येक शनिवारी या सुट्टीच्या दिवशी चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या चाचणीसाठी शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी 500 तर पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 350 चा कोटा उपलब्ध आहे. चाचणीकरीता येताना सर्व अर्जदारांनी चेह-यावर मास्क व हँड ग्लोव्हज घालणे बंधनकारक राहील. तसेच सोशल डिस्टंन्सींगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
जाहिरात:-
Comments are closed