पिंपरी,दि.३(punetoday9news):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी वाहतुक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या व विना मास्क वाहन चालकांवर कारवाई दरम्यान तोतया सहायक पोलीस आयुक्त मुंबई यांचे बनावट ओळखपत्र दाखवणाऱ्या प्रविण लक्ष्मण सुर्यवंशी यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी वाहतुक विभागातर्फे जाधव सरकार चौक कुंदळवाडी या ठिकाणी पी.टी.पी.नाकांबदी व विना मास्क ची कारवाई चालू असताना होंडा जांज कार क्र. एम.एच .५० एल .२२१६ या कारमध्ये बसलेल्या दोन इसमांनी मास्क घातलेले नव्हते . तसेच कारवाई होणार असे लक्षात येता चालका शेजारी बसलेल्या प्रविण सुर्यवंशी याने स्वतः मुंबई पोलीसांत ए.सी.पी. असल्याचे सांगितले व बनावट ओळखपत्र दाखवले.
असे फुटले भिंग:-
सदरच्या ओळखपत्रावर असलेल्या फोटोमध्ये फोटोतील व्यक्तीच्या खादयांवर राजमुद्रा व स्टार असल्याचे फोटोत दिसत असल्याने ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले.
अधिक चौकशी केल्यावर सदर इसमाने ओळखपत्र बनावट असल्याचे मान्य केले.
या प्रकरणात पोलिस सुनिल गायकवाड यांनी चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे .चिखली पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपआयुक्त ( वाहतुक शाखा ) सुधिर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले , पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे , यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उप निरीक्षक एस.एस.राउत , गायकवाड , दहिफळे , कशाळे , कोल्हे यांनी केली आहे .
Comments are closed