पिंपरी,दि.४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अवैधरित्या कल्याण मटका, जुगार खेळणे व खेळविणाऱ्या तसेच विनापरवाना विदेशी दारु,बियरची विक्री करणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाळुंगे पोलीस चौकी हद्दीत अवैधपणे कल्याण मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार ओम दत्त श्री ठाकुर महाराज सेवाश्रमचे पाठीमागे , आंब्याच्या झाडाखाली हिरव्या जाळीखाली येलवाडी , देहुगाव , पुणे येथे सापळा रचुन छापा टाकुन मुद्देमालासहित आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एकुण ५८,६१० रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी ज्ञानेश्वर साहेबराव उपाडे( वय २३ वर्षे , रा . मु.पो.पळशी , ता . रैणापुर , जि . लातुर) व इतर ०८ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म्हाळुगे पोलीस चौकी करीत आहे .
तसेच सामाजिक सुरक्षा विभागातील दुसऱ्या पथकाने हॉटेल टॉवर लाईन , सोनवणेवस्ती , तळवडे , चिखली , पुणे येथे अवैधपणे विनापरवाना विदेशी दारु व बियर विक्री प्रकरणात कारवाई करत चिखली पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकला असुन एकुण ६९ ,९६२ रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी राहुल रमेश बिसास (वय २४ वर्षे, रा . सोनवणे वस्ती , तळवडे, चिखली) व इतर ०१ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , मा . सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे , पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे , विजय कांबळे , नितीन लोंढे , संदिप गवारी , सुनिल शिरसाठ , संतोष बर्गे , अनिल महाजन , महेश बारकुले , गणेश कारोटे , दिपक शिरसाट , मारोतराव जाधव , वैष्णवी गावडे , संगिता जाधव , योगिनी कचरे यांनी केली.
Comments are closed