मुंबई,दि.४(punetoday9news):- दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? याबाबत संभ्रम आत्तापर्यंत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या देखील मनात होता.त्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा स्पष्ट पणे परीक्षा ही ऑफलाईनच होणार हे जाहीर केले. तसेच दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? आणि त्याचा पॅटर्न कसा असणार याविषयी माहिती दिली आहे.
त्या म्हणाल्या, दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच ऑफलाईन होणार असल्याचे सांगितले आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात किंवा पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
आठवी, नववी या वर्गाच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारल्यानंतर, या प्रश्नाचे उत्तर देताना देखील त्यांनी लवकरच याबाबत निर्णय घेऊ. कारण, कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची आरोग्य सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे आणि तिलाच राज्य सरकार आणि शिक्षण विभाग प्राधान्य देत आहे, असे सांगितले आहे.
साधारणतः मार्च मध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात. मात्र पेपर सेटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली असते. गाव खेड्यांपर्यंत हे पेपर जायला निदान दोन महिन्याचा कालावधी लागतो. ऑगस्ट मध्ये आम्ही सिलॅबस कमी करण्याचे काम केले असे देखील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
या कालखंडामध्ये परीक्षा होणार असल्याने आता तज्ञांशी सल्लामसलत करून येणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शनाचे स्वागत आहे त्याच बरोबर सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार, आता विचार सुरू असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
Comments are closed