पुणे,दि.५(punetoday9news):- पुणे शहर व जिल्हा टीडीएफ व पुणे शहर व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

यावेळी शालार्थ प्रकरणे निकाली काढणे, अघोषित शाळांना अनुदान मंजूर करणे , जुनी पेन्शन योजना लागू करणे, डी.सी.पी.एस.धारकांचा हिशोब व पावत्या , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण, वाढीव विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदानित पदांची निर्मिती, शाला बाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला स्थगिती अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.

मुंबई येथे आझाद मैदानावरील आंदोलनाला टीडीएफ चा पाठींबा असून त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा टीडीएफ संघटनेच्या वतीने राज्य भर आंदोलन केले जाईल असेही सांगण्यात आले.

वरिल मागण्या बाबतीत माहिती कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवले जाईल असे जगताप (संचालक माध्यमिक, महाराष्ट्र राज्य) यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आश्वासन दिले.

शिक्षणाधिकारी यांच्या वतीने सदर निवेदन पुणे जिल्हा परिषद विस्तार अधिकारी (शिक्षण) दोंदे यांनाही देण्यात आले. तसेच संघटनेच्या वतीने संविधानाची प्रत देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी राज्य टीडीएफ चे अध्यक्ष हनुमंत भोसले, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत ताकवले, पुणे शहर टीडीएफ चे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी कामथे, टीडीएफ चे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल चे अध्यक्ष रामप्रभू पेटकर, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, टीडीएफ चे पुणे शहर सचिव संतोष थोरात, माध्यमिक चे कार्याध्यक्ष विजय कचरे ,उपाध्यक्ष गुलाब नेटके, महिला आघाडी प्रमुख डाॅ.उज्ज्वला, हातागळे , कार्यवाह विजय ढवळे, पुणे शहर टीडीएफ चे उपाध्यक्ष सुनिल गिरमे, प्रशांत आबणे, पापळ , शिवरकर , हवेली ता.टीडीएफ चे अध्यक्ष अशोक नाळे व शहरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!