चिंचवड,दि.५(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड मधील काळभोर नगर येथील जय टॉवर  बिल्डींगमध्ये ‘काव्यांजली स्पा’ मसाज सेंटरमध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या माहितीवरून सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जय टॉवर नावाच्या बिल्डींगमध्ये , तिसऱ्या मजल्यावर , काळभोर नगर , चिंचवड , पुणे काव्यांजली मसाज सेंटरमध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन माहिती सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचुन छापा टाकुन एक पिडीत मुलगी व एक तृतीयपंथीची सुटका केली आहे.

या प्रकरणात आरोपी दर्पण दिलीप कुमार (वय ३२ वर्षे रा . पाचपीर चौक , काळेवाडी. मुळ- जक्की बीगहा , देहरी राज्य बिहार) व इतर ०१ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशन करीत आहे .

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश वाघमारे पोलीस अंमलदार विजय कांबळे , संतोष असवले , नितीन लोंढे , संदीप गवारी , दिपक शिरसाट , योगेश तिडके , मारोतराव जाधव , संगिता जाधव , सुप्रिया यादव , तेजस्विनी शेलार यांनी केली आहे .

Comments are closed

error: Content is protected !!