मुंबई,दि.५( punetoday9news):- भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी सापडली होती . मात्र या प्रकरणात ही गाडी तिथे कोणी आणली याविषयी माहिती समजू शकली नव्हती. सापडलेल्या कारचे मूळ मालक मनसुख हिरेन यांंचा संशयास्पद मृत्यू झाला आहे .
त्यामुळे प्रकरणात अजुन गुढता वाढली आहे. स्फोटके ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते . मात्र प्रकरणातील मुळ आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आले नव्हते.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे . मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते . कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती .
या विषयावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही शंका उपस्थित करून घटनाक्रम वाचून दाखवला आहे तसेच पोलिस अधिकारी सचिन वाझे व ठाणे कनेक्शन यावर भाष्य करत ह्या प्रकरणाची चौकशी एनआयए कडे देण्याची मागणी केली आहे.
तर गिरिष महाजन यांनी सत्य स्थितीवर भाष्य करत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
जाहिरात:-
Comments are closed