अहमदाबाद,दि.६(punetoday9news):- भारतीय संघाने अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये एक संपूर्ण डाव आणि २५ धावांनी इंग्लंडच्या संघाचा पराभव केला. आणि भारतीय संघाने कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. अखेरच्या कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयामुळे भारतीय़ क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. जिथे भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे.
चौथा कसोटी सामना हा संघातील युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली. ऋषभ पंत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचे वर्चस्व कमी होऊ न देता इंग्लंडच्या संघावर दबाव कायम राखला.
या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात इंग्लंडने २०५ धावा केल्या. यास उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी ३६५ धावांसह इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडचा संघ केवळ १३५ धावांवर तंबूत परतला. ही ऐतिहासिक कामगिरी करताना अक्षर पटेलने सर्वाधिक ९ गडी बाद केले. तर, अश्विनने ८ गडी बाद केले.
Comments are closed