पुणे, दि.६( punetoday9news):- राज्य महिला आयोगाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, चर्च रोड, पुणे-3 येथे महिला व बाल विकास आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्हयांमध्ये महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्याच्यादृष्टीने महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ञ समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन कडून सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे नोंद घ्यावयाच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित, नियोजित सुनावण्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येतील.
विभागातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पिडीत महिलांनी व अशा महिलांना मदत करु इच्छिणा-यांनी दूरध्वनी क्रमांक 020-26112004 अथवा ईमेल आयडी div.wcd.pune1@gmail.com किंवा समक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास उप उपायुक्त दिलीप हिवराळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments are closed