• व.पो.नि विठ्ठल कुबडे यांनी सामाजिक सुरक्षा पथकातील पो.उप.नि प्रदिपसींग सिसोदे व पो.उप.नि धैर्यशिल सोळंके तसेच पथकातील पोलीस अंमलदार यांच्या दोन टीम तयार करून प्रकार केला उघड.
• आरोपींनी आजपर्यंत ७०० ते ८०० गिऱ्हाईकांना दिली बनावट सर्टिफिकेट, कागदपत्रे.
पिंपरी, दि. ६(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील ‘आशीर्वाद सायबर कॅफेवर’ सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून वाहनांची बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीला अटक केलेे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल प्रसाद गौंड (वय २३ वर्षे, रूपीनगर,निगडी ), बालाजी गोरख बाबर (वय २३ वर्षे , रा. संदीपनगर,थेरगांव ) तुकाराम अर्जुन मगर (वय ३० वर्षे, रा. गजानन नगर ,काळेवाडी फाटा ) प्रविण दशरथ दळवे (वय २५ वर्षे रा. राशे फाटा , चाकण) यांना अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी आरटीओ फिटनेस , टॅक्स पावती , वाहन इन्शुरन्स , पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ही बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या आरोपात अटक केली आहे.
अशी केली कारवाई:-
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे वपोनि विठ्ठल कुबडे यांना सदर बातमीची शहानीशा व खात्री करुन कारवाई करणेबाबात सुचना दिल्या .
वपोनि विठ्ठल कुबडे यांनी त्यांचे सामाजिक सुरक्षा पथकातील पोउपनि प्रदिपसींग सिसोदे व पोउपनि धैर्यशिल सोळंके तसेच पथकातील पोलीस अंमलदार यांच्या वेगवेगळया दोन टीम तयार करुन व स्वतः टिमचे नेतृत्व करुन सापळा रचुन छापा टाकला असता आरोपी राहुल प्रसाद गौंड हा संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करताना आढळून आला .
त्याच्या संगणकाची व मोबाईलची पाहणी केली असता त्याचे इतर साथीदार हे व्हॉट्सॲपद्वारे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्याचे मोबाईलवर माहिती पाठवित होते व त्या माहितीच्या आधारे आरोपी राहुल गौंड हा बनावट नाव , दिनांक , शिक्के , सिरीयल क्रमांक व फोटो तयार करुन नंतर त्याची प्रिंट काढत असे व त्यावर बनावट शिक्के मारुन कलर प्रिंटर व झेरॉक्स मशिनच्या साहाय्याने त्याची कलर झेरॉक्स प्रिंट काढुन ती प्रिंट स्वतःच्या मोबाईल व्हॉट्सअपद्वारे त्याचे इतर साथीदारांना पाठवुन गुगल पे द्वारे व रोख रक्कमेस्वरुपात पैसे स्विकारुन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी माहिती डिलीट करीत असे. अशा प्रकारे आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणुक करताना आढळून आला.
त्यांनी आजपर्यंत ७०० ते ८०० गिऱ्हाईकास बनावट सर्टिफिकेट तसेच कागदपत्रे तयार करुन दिली असल्याने ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाच्या तीन टिम तयार करुन वरील आरोपींना रात्री दरम्यान वेगवेगळया ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे .
फिल्मी स्टाईलने पळ काढण्याचा आरोपीचा प्रयत्न.
आरोपी तुकाराम अर्जुन मगर यास सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिसांनी हात दाखवुन थांबविले असता त्याने पोलिसांना ओळखपत्र मागितले. तसेच आरोपीने गाडीच्या काचा बंद केल्या त्यामध्ये पोहवा संतोष बर्गे यांचा हात अडकल्याने ते १५-२० फुट अंतरावर फरपटत जावून जखमी झाले. तर गाडीसमोर उभे असलेल्या पोहवा संदीप गवारी यांच्या अंगावर गाडी घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे .वरील दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, कृष्ण प्रकाश. अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके तसेच पोलीस अंमलदार विजय कांबळे , अनंत यादव , संतोष बर्गे , संतोष असवले , नितीन लोंढे , संदिप गवारी , सुनिल शिरसाट , दिपक साबळे , महेश बारकुले , विष्णु भारती , अनिल महाजन , गणेश कारोटे , दिपक शिरसाट , मारोतराव जाधव , योगेश तिडके , गणेश गायकवाड , अतुल लोखंडे , महिला अंमलदार वैष्णवी गावडे , संगिता जाधव यांनी केली आहे .
Comments are closed