पिंपरी,दि.७( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र सोशल डिस्टंसिंग च्या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असल्यासारखे वावरताना दिसत आहेत. अजुनही धोका टळला नाही. हे सरकार वारंवार सांगत आहे मात्र लोकांच्या नजरेतून याचे गांभीर्य संपले का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे लोकांना जागे करण्यासाठी पिंपळे गुरव येथील आदिलक्ष ग्रुप च्या वतीने लहान चिमुकल्यांनी स्वतः मास्क लावत नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
किराणा दुकान,चहाची टपरी, भाजी मंडई, बस थांबे व सर्वच सार्वजनिक ठिकाणी लोक सर्रास सोशल डिस्टंसिंग च्या नियमांना तिलांजली वाहताना दिसून येत आहेत. त्यामुळे ही गोष्ट चिंताजनक असूनही लोक व प्रशासन यास गांभीर्याने घेत नाही अशी दयणीय अवस्था आहे. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदिलक्ष ग्रुपच्या वतीने कामगार वस्तीमधील मुलांनी स्वतः मास्क वापरून जनजागृतीचा संदेश दिला आहे.
आम्ही मास्क वापरतो, काळजी घेतो तसे तुम्हीही आपल्या स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असा सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रतिक सोनार, आदिती निकम, श्रावणी कारंडे,रुद्र राऊत, अनिल मुळे उपस्थित होते.
जाहिरात:-
Comments are closed