मुंबई,दि.७(punetoday9news):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या भेटीपासून ज्येष्ठे अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

मात्र आता पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी देखील गेले होते.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील महिन्यात मिथून चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती.

या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं.

2011 मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं.

2016 मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

जाहिरात:-

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!