फ्रान्स, दि. ८ ( punetoday9news):-  राफेल भारतात बहुचर्चित अशा राफेल विमान बनवणाऱ्या कंपनीचे मालक, फ्रान्सचे अब्जाधीश आणि संसद सदस्य, ओलिवियर दसॉल्ट यांचा एका हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. दसॉल्ट 69 वर्षाचे होते.

ते फ्रान्सचे अब्जाधीश सर्ज दसॉल्ट यांचे सर्वात मोठे पुत्र होते. दसॉल्ट ग्रुप युद्ध विमानांचे निर्माण करते, शिवाय ग्रुपचे फिगारो नावाचे एक वृत्तपत्रही आहे.

मॅक्रोन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “ओलिवियर दसॉल्ट फ्रान्सवर प्रेम करायचे. त्यांनी उद्योग, कायदे निर्माण, निवडणूक अधिकारी, वायु सेना कमांडर म्हणून देशाची सेवा केली आहे. त्यांचे असे अचानक जाणे देशासाठी मोठी हानी आहे.”

ओलिवियर 2002 मध्ये रिपब्लिक पक्षाचे आमदार म्हणून काम पाहत होते.

दुर्घटनेदरम्यान ऑलिवियर सुट्टीवर होते. 2020 फॉर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, दसॉल्ट यांना त्यांचे दोन भाऊ आणि एका बहिणीसोबत जगातील 361 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांना स्थान देण्यात आले होते.

दुर्घटनेत ओलिवियर दसॉल्ट यांच्यासह त्यांच्या वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा दुर्घटनेत अचानक जाण्याने जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात:-

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!