पुणे, दि.८( punetoday9news):- कोणत्याच क्षेत्रात काम करण्यास स्त्री मागे नाही, ही अभिनंदनीय बाब आहे. स्त्रियांच्या यशाचं कौतुक केल पाहिजे, असे गौरवोद्वार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.
मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केलेल्या उत्कृष्ट महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महिला मतदारांना लोकशाही प्रक्रियेसंदर्भात जागरुक करुन त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या कार्याला पुढे आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यायला हवेत. स्त्रियांच्या कामाचे यथोचित कौतुक व्हायला पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुप्रिया टेमकर, कोमल राऊत, उषा सुरवसे तसेच माहिती सहायक गीतांजली अवचट यांचा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
जाहिरात:-
Comments are closed