पिंपरी,दि.८(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान केला.
आज महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी सामाजिक कला, क्रीडा, वैद्यकीय, राजकीय,प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील महिलांच्या भेटी घेऊन त्यांचा सन्मान केला.
सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक म्हणाला, “इतरांना नेहमी मदत करणाऱ्या व गरजवंत यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या नारी शक्तींचा सन्मान होणे गरजेचे आहे. या नारीशक्तींच्या माध्यमातून इतर महिलांना मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य लाभत असते त्यामुळे या मार्गदर्शक नारीशक्तीचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे.”
महिला दिनाच्या औचित्याने डाॅ.विजया आंबेडकर,वैद्यकीय अधिकारी, इंदिरा गांधी रूग्णालय, सांगवी, नगरसेविका उषा मुंडे, चंदा लोखंडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलिस अधिकारी हबले , महिला दक्षता समिती, पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड, पोलिस निरीक्षक धुमाळ, भरोसा सेल स्टाफ, कविता बटवाल,परिचारिका सह्याद्री रुग्णालय. तसेच इतर महिलांंचा सन्मान करण्यात आला.
जाहिरात:-
Comments are closed