पुणे,९( punetoday9news):- महिला दिनाचे औचित्य साधून विमाननगर च्या श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेत महिला दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या कार्यवाह आदरणीय किरण तावरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या तीनही शाळांमधील महिला शिक्षकांच्या कर्तृत्वाचा गौरव करून पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या कार्यवाह किरण तावरे यांचा सन्मान मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात त्यानंतर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश पाटील, तंत्र विभाग प्रमुख गद्रे, हिंद इंग्लिश मिडीयम गुरुकूल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रिती मानेकर, शिक्षक थोरात, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
किरण तावरे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि, “स्त्रियांचा आदर, सन्मान हा फक्त महिला दिनाच्या दिवशी न करता दैनंदिन जीवनात आपल्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त केला पाहिजे व तसे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवले पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक घोगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मासाळ यांनी केले.
जाहिरात:-
Comments are closed