पुणे,दि.९( punetoday9news):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गिर्यारोहण क्षेत्रातील अवघड असा वजीर सुळका महिला गिर्यारोहकांकडून सर करून साजरा करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला २५० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी दोन रस्ते जातात एक वांद्रे गावातून गेल्यानंतर एक मंदिर लागते मंदिरापासून दीड तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जरासेही पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची २५० फुटाची ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते.
महिला दिनाच्या निमित्ताने विशेष काहीतरी आयोजन म्हणून वजीर सुळका सर करण्याचे ठरवले यामध्ये आमची १३ जणांची टीम होती विशेष म्हणजे ४ महिलांनी यात सहभाग नोंदवला होता.
प्रिती जोशी, सरिता मिसाळे, अश्विनी भिसे, शितल पवार, अभिषेक वाघ, विशाल पुणेकर, विठ्ठल गोरे, चंद्रकांत कोसे, निखिल कोळी याांनी अनिल वाघ (पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दल), वेदांत व्यापारी, जॅकी साळुंखे, गिरीश डेगाणे, अमोल तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर सुुुुळका सर केला.
जाहिरात:-
Comments are closed