• ‘ड’ प्रभागाने लाजिरवाणी आघाडी घेतली असुन ६३५ पैकी तब्बल ११९ रूग्णांची नोंद.

• ‘कोरोना योद्धा’ म्हणून पुरस्कार घेणारेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम तुडवतात पायदळी. 

• “लोक नियम पाळत नाहीत” असे सांगणारेही नियम तोडणाऱ्यांच्या रांगेत. 

पिंपरी, दि.९( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख परिसरातील ‘ड’ प्रभाग कोरोना रूग्णांच्या आकडेवारीचा आलेख वाढताच दिसत आहे. एकीकडे राज्य सरकार शाळा, महाविद्यालय बंद करत आहे. सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मग तरीही कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत वाढ का होतेय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मंगळवार दि ९ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहुया.

एकुण रूग्णसंख्या ६३५ पैकी ‘ड’ प्रभागाने लाजिरवाणी आघाडी घेतली असुन तब्बल ११९ रूग्णाची नोंद झाली आहे. 

त्यामुळे नागरिक केवळ सरकार म्हणते म्हणून तात्पुरते नियम पालन केल्याचा देखावा किती दिवस करणार? याचा विचार करण्याची खरी गरज आहे.  मास्क हनुवटी वर , गळ्यावर लावून नागरिक नक्की कुणाला फसवत आहेत? जवळपास ९०% दुकानदार, व्यावसायिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करतच नाही ही वस्तुस्थिती आहे.  त्यात एखादा सुजाण नागरिक नियमांची आठवण करून देत असेल तर त्याची दुकानातून हकालपट्टी करायलाही मागे पुढे पाहिले जात नाही.

नागरिकांमध्ये कोरोना विषयीची काळजी, आपल्या कुटुंबाविषयीची काळजी देवदर्शनाच्या रांगेत थांबल्यावर कुठे नाहीशी होते? समुद्र किनारी फिरायला जाताना, मोठमोठ्या कार्यक्रम, लग्न समारंभ, उद्घाटन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावत गर्दीत दाटीवाटीने सहकुटुंब घुसून सेल्फी काढताना ही काळजी नसते का? याचा नागरिकांना सजगतेने व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. की आपण नक्की कोणाला फसवत आहोत? स्वतःला, कुटुंबाला की प्रशासनाला?

तब्बल एक वर्ष भर कोरोनाने थैमान घातले. कित्येक कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला.  कित्येकांचे संसार मोडले तर कित्येकांनी एक वेळच्या अन्नासाठी परिस्थितीशी झुंज दिली.  मात्र आपण सजग नागरिक म्हणून यातुन काय बोध घेतला? हे विचार करण्याची गरज आहे.

यातही काही अतिहुशार महाशय पहायला मिळतात आता मी लस घेतली मला काही होणार नाही या अविर्भावात गावभर मिरवत आहेत. मात्र आपण सुरक्षित झालात म्हणून इतरांना संकटात टाकून सुपर स्प्रेडर बनून इतरांचे अप्रत्यक्षरित्या बळी घेण्याचे काम करण्याचा अधिकार आपणास प्राप्त झाला नाही हा ही विचार करायला हवा.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!