पिंपरी,दि.१०( punetoday9news):- सांगवी परिसर महेश मंडळ ( महिला समिती) पुणे. समिती च्या वतीने जागतिक महिला दिवस निमित्ताने संगीता धायगूडे (उप आयुक्त नाशिक) यांचे संभाषण आयोजित करण्यात आले होते .
जेव्हा स्री दृढ निश्चय करते तेव्हा कठिन परिस्थिती असुनही ती यश संपादन करू शकते. महिला दिनी विशेष अतिथी, संगीता धायगुडे, उल्लेखनिय व्यक्तिमत्व एवं लेखिका यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. तसेच उपस्थित महिला बरोबर संवाद साधला.
त्यानंतर ५० वर्षांवरील महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . त्यात उपस्थित महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पद्मा लोहिया, गौरी नावंदर, अमृता जाखोटिया, श्रुति मंत्री, कविता लड्ढा, आदींनी कार्यक्रम साठी परिश्रम घेतले.
Comments are closed