पुणे, दि. ११(punetoday9news):- पुण्यात परीक्षा पुण्यात एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्या मुळे विद्यार्थी नाराज.

सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी.

ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी.

त्यासाठी हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर.

विविध नेत्यांनी या प्रश्नावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे : रोहित पवार

कोरोनाचे नियम पाळून एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, “कोरोनामुळे यापुढे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावे लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपण याकडे लक्ष द्यावे, ही विनंती!”

अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नाही : पृथ्वीराज चव्हाण

अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नसल्याचे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. परीक्षेबाबत अनिश्चितता तयार करणे योग्य नसून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी देखील केली चव्हाण यांनी केली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!