पुणे,दि.१२( punetoday9news):- ५६ (RR) राष्ट्रीय रायफल मराठा लाईट इन्फंट्री आणि तोफखाना विभाग यातील माच्छाल, कुपवाडा,काश्मीर या परिसरामध्ये शहीद झालेल्या परिवारातील वीर माता आणि वीर पत्नींचा सन्मान करण्याचा अतूट बंधन कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे लष्करी थाटात हा नागरी सन्मान कोव्हिड मुळे करता आला ना यंदा अतूट बंधन हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतला गेला.
कार्यक्रम सुलभ करण्यासाठी बटालियनमधील स्वयंसेवकांकडून आवश्यक समन्वय साधला गेला.
हा कार्यक्रम करण्यासाठी बटालियनच्या स्वयंसेवकांनी माच्छाल कुपवाडा ते तमिळनाडूमधील मदुराई, गुजरातमधील भावनगर व वडोदरा, गोरखपूर (उत्तर प्रदेश), भागलपूर (बिहार), संगरूर (पंजाब), उज्जैन (खासदार), झुंझुनू आणि भिलवारा पर्यंत प्रवास केला.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या शहीद परिवारांचा कार्यक्रम वाई तालुका सातारा येथे घेण्यात आला.
औरंगाबाद, परभणी, बीड आणि मुंबई या ठिकाणी देखील शहीद परिवारांच्या घरी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह व रोख प्रोत्साहन सन्मानपूर्वक भेट देऊन त्यांना युनिटच्या कामकाजाविषयी आणि भारत सरकार, राज्य सरकार आणि भारतीय सैन्य दलाच्या विविध कल्याणकारी योजना आणि तरतुदींविषयी कुटुंबांना माहिती दिली.
आज पर्यंत हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावलेला आहे आज हिमालयाच्या कुशीतील काश्मीरमधून
कुपवाडा सेक्टर येथील माछाल मधून कलारुस गावचे सरपंच जुबेर भट्ट हे शहीद परिवाराला भेटण्याकरता आले होते.
पूर्वी सैनिकांवर काश्मीर खोऱ्यामध्ये सैनिकांवर दगडफेक होण्याच्या काही घटना घडल्या होत्या मात्र आज सत्य परिस्थिती समजल्यानंतर मतपरिवर्तन होवून त्या ठिकाणाहून त्यांचे प्रतिनिधी शहीद परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.
लायन्स क्लबचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांनी लायन्स क्लबच्या वतीने प्रत्येक शहीद परिवाराला रोख रकमेचे पाकीट दिले.
शहीद परिवारातील वीरनारी, वीरमाता यांना उद्भवणाऱ्या तक्रारी व अडचणी यांचे नोंद करण्यात आली आणि लवकरच त्याचे निवारण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सैनिक संस्था आणि वेटरन्स इंडिया यांनी स्वीकारली आहे.
शुभांगी सरोते, स्मिता माने, किशोरी अग्निहोत्री, प्रणाली कासले (मुंबई) योगिता सोनवणे (नवी मुंबई) या महिलांनी विशेष व मोलाचे सहकार्य केले. तर प्रताप भोसले यांनी महिलादिनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम परिपूर्ण केला.
Comments are closed