• हॉटेल्स, मॉल्स, पान टपरी, मंगल कार्यालय, खाजगी मोठी ऑफिसेस, बँका, ई. सार्वजनिक, व्यावसायिक ठिकाणी मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वे न पाळणे याबबत व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पुणे,दि.१२( punetoday9news):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे, ग्लोव्हज वापरणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे.
वेळोवेळी निर्गमित आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने कारवाई करण्यात आली. शहर स्वच्छता व नियोजन कायद्या अंतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण करून गैरसोय करणे या अधिनियमान्वये व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे दंड वसूल करण्यात आला.
शिवाजी नगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने महापालिका सहायक आयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय. एस. इनामदार, सुनील कांबळे, व सर्व आरोग्य निरीक्षक यांचे सहाय्याने पुणे मुंबई रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर बस ई रेल्वे स्थानक परिसर, जंगली महाराज रोड, एफ सी रोड येथील हॉटेल्स, मॉल्स, पान टपरी, मंगल कार्यालय, खाजगी मोठी ऑफिसेस, बँका, ई. सार्वजनिक, व्यावसायिक ठिकाणी मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वे न पाळणे याबबत व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ हॉटेल, २ मंगल कार्यालय, २ शॉपिंग मॉल, ३ पान टपरी, ४ मोठी दुकाने ई. दुकानांवर कारवाई करण्यात आली.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, नरेंद्र भालेराव व इतर आरोग्य निरीक्षक यांचे सहाय्याने कारवाई करण्यात येऊन मास्क न वापरणारे ४१ नागरिकांकडून र.रु. २०५००/- व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांकडून २५००/- सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नाग्रींकडून ३०४०/-, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून १२००/- असे एकूण २७२४०/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील तंवर व इतर आरोग्य निरीक्षक यांचे सहाय्याने कारवाई करण्यात येऊन मास्क न वापरणारे १९ नागरिकांकडून र.रु. ९५००/- व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांकडून २८००/- ओला व सुका कचरा एकत्र करणाऱ्या नागरिकांकडून ६२०/- असे एकूण २५८४०/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त वैभव कडलख यांच्या मार्गदर्शनानुसार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घावटे व इतर आरोग्य निरीक्षक यांचे सहाय्याने प्रभाग क्र. १ विश्रांतवाडी येथे कारवाई करण्यात येऊन मास्क न वापरणारे २ नागरिकांकडून र.रु. १०००/- व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या २३ नागरिकांकडून २७००/- असे एकूण ३७००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडील उपायुक्त संदीप कदम, महापालिका सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी. ए. आवटी व इतर आरोग्य निरीक्षक यांचे सहाय्याने प्रभाग क्र. २५, साळुंखे विहार रोड या ठिकाणी कारवाई करण्यात येऊन मास्क न वापरणारे १४ नागरिकांकडून र.रु. ७०००/- व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ३ नागरिकांकडून ५०००/- सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून ८००/-, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून १२००/- असे एकूण १२८००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
Comments are closed