नाशिक, दि.१३( punetoday9news):- संपूर्ण  महाराष्ट्रात लाॅकडाउनच्या काळात आलेल्या विजबिलात सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर सरकारकडून सवलत देण्याचे संकेतही देण्यात आले होते. 

मात्र सद्यस्थितीत सरकारने विजबिलात कसल्याही प्रकारे सवलत न देता बील न भरलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडण्यास सूरूवात केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.  त्यावर विनंती करत तात्काळ सरकारने निर्णय बदलून वीजबील भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच शेतकरी विरोधी भूमिका सरकार घेणार असेल तर त्यास आंदोलनाने उत्तर देण्यात येईल असे नाशिक जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!