Cricket (Ind vs SA legends):-  युवराज सिंगने पुन्हा एकदा सहा षटकार मारत क्रिकेट प्रेमींना भेट दिली आहे . केवळ 21 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करून अजुनही तेवढाच जोश बाकी असल्याचे दाखवून दिले आहे 

इंडिया लिजेंन्ड्सच्या वतीने खेळताना युवराज सिंगने पुन्हा एकदा सहा षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. यावेळी त्याने आठ चेंडूत सहा षटकार मारले आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका लिजेन्ड्स संघाविरोधात खेळताना युवराज सिंगने २२ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी खेळली आहे. युवराजच्या या खेळीमुळे इंडिया लिजेन्ड्सने दक्षिण आफ्रिकासमोर २०५ धावांचे लक्ष ठेवले.

युवराज सिंहने १८ व्या षटकात ब्रॉडच्या गोलंदाजीवर चार षटकार मारले आणि आपल्या एकाच सहा चेंडूतील सहा षटकाराची आठवण करुन दिली. युवराजने केवळ २२ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. या आधी त्याने इंग्लंडविरोधात सहा चेंडूत सहा षटकार मारले होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!