• 165 धावांचे आव्हान.

• 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण.

 

अहमदाबाद,दि.१५( punetoday9news):-  टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला . भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे .

कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली . कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी साकारली . याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत 32 बॉलमध्ये 56 धावा केल्या.

भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन याने रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मने जिंकली . संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्याने निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे . इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी 20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन याने 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली . चौकार आणि षटकारांची बरसात करत त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणले . षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केले . त्याने एकूण 32 चेंडूंमध्ये 56 धावांची प्रभावी खेळी करत सर्वांची मने जिंकली.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!