पिंपरी :- निसर्ग चक्रीवादळाने क्षतीग्रस्त झालेल्या मंडणगड तालुक्यातील बोरखत कोंड, कुडुक पंचकोशीतील वादळग्रस्त गावात आर,व्हि,सहज चॅरिटेबल ट्रस्ट (महा.राज्य) व स्वराज्य कोकण संघटना.सर्वोदय प्रतिष्ठाण चिपळून यांच्यावतीने अन्न धान्य किट, ब्लँकेट अशा वस्तू रुपात किटचे वाटप करण्यात आले. तालुक्याला ३ जुन रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्या राज्यात सर्वत्र पोहचल्या. ते पाहून अस्वस्थ झालेले मूळचे मंडणगड येथील प्रकाश यादव यांनी तेथील परिस्थिती विषयी माहिती दिली . ट्रस्टच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नुकसान ग्रस्तांना मदत करण्याची कल्पना चिपळून व पुण्यातील सहकऱ्यांसमोर मांडण्यात आली .त्यानंतर स्वराज्य कोकण संघटनेचे प्रकाश यादव सर्वोदय प्रतिष्ठानचे शुभम जाधव, राहुल मुंगले, तेजस जंगम, राकेश जाधव व आर.व्हि.सहज चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष राहुल व्यवहारे यांनी यथाशक्ती योगदान दिले. यातून अन्नधान्य व सर्व दैनंदिन गरजेच्या वस्तूचे किट बोरखत व कुडूक येथील ग्रामस्थांना मदत म्हणून दिले .
इतर मदतीची वाट न पाहता कोकणवासियांच्या उभारणीसाठी समाजातील दानशुरांनी खारिचा वाटा उचलल्यास कोकणी माणूस पुन्हा उभा राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोल्हापूर आणि सांगली मधील पुरग्रस्तांना केलेल्या मदतीप्रमाणे एक हात मदतीचा देऊन कोकण परत उभं करूया अशी भावना आर.व्हि.सहज चॅरिटेबल टूस्ट चे संस्थापक अध्यक्ष राहुल व्यवहारे यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या कामाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
Comments are closed