पुणे,दि. १५( punetoday9news):-  पुणे शहरातील  लष्कर जलकेंद्र व भामा आसखेड जलकेंद्र येथील विद्युत , पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम असल्याने गुरूवार (दि.१८ ) रोजी पुणे शहराचा काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे .

तसेच शुक्रवार (दि. १९ ) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे . तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

लष्कर जलकेंद्र भाग : – हडपसर , महमंदवाडी , काळेपडळ , मुंढवा , नगररस्ता , कल्याणीनगर , वडगाव शेरी , चंदननगर , खराडी , सोलापूर रस्ता , गोंधळेनगर , सातववाडी  .

भामा आसखेड जलकेंद्र विभाग : – लोहगाव , धानोरी , विमाननगर.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!