मुंबई,दि.१५( punetoday9news):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावी बोर्ड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवला जात असताना फारसा बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीला वेळ विद्यार्थ्यांना मिळाला नाही असे पालकांचे व विद्यार्थ्यांचे म्हणने होते त्यामुळे शिक्षण विभागाने घोषणा केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.
हे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव व्हावा म्हणून देण्यात आले असून यातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, असे एससीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एससीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Comments are closed