पुणे,दि.१६( punetoday9news):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे, ग्लोव्हज वापरणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे.
वेळोवेळी निर्गमित आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने कारवाई करण्यात आली. शहर स्वच्छता व नियोजन कायद्या अंतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण करून गैरसोय करणे या अधिनियमान्वये व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे दंड वसूल करण्यात आला.
वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडील मा. महापालिका सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी. ए. आवटी व इतर आरोग्य निरीक्षक यांचे सहाय्याने प्रभाग क्र. २५, शिवरकर रोड या ठिकाणी कारवाई करण्यात येऊन मास्क न वापरणारे ४४ नागरिकांकडून र.रु. २२०००/- व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या १६ नागरिकांकडून ४००००/- असे एकूण ६२०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
तसेच येरवडा, प्रभाग क्र. १ व प्रभाग क्र. ६ मध्ये मा. महापालिका सहायक आयुक्त वैभव कडलख व येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडील इतर अधिकारी व कर्मचारी यांचे सहाय्याने मास्क न वापरणारे नागरिकांकडून व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांकडून एकूण १४९००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
Comments are closed