टेक. ज्ञान( punetoday9news):- इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी स्टॉर्म मोटर्सने सोमवारी दावा केला की, त्यांच्या वाहनाच्या एकमेव मॉडेल स्टॉर्म आर 3 साठी एकूण 165 युनिट बुक करण्यात आले आहेत. रुपयाच्या हिशोबाने हे बुकिंग 7.5 कोटी रुपये आहे. कंपनीची ही कार अद्याप बाजारात आली नाही . त्याची किंमत साडेचार लाख रुपये आहे.

काय खासियत आहे:- 

स्टॉर्म R3 या कारचे बुकिंग नुकतेच सुरू झाले आहे आणि केवळ 10,000 रुपये देऊन बुक केले जाऊ शकते. ही एक स्पोर्टी दिसणारी कार आहे आणि यात 2 जणांना बसण्यासाठी केबिन आहे. इलेक्ट्रिक कारची लांबी 2,907 मिमी, रुंदी 1405 मिमी आणि उंची 1572 मिमी आहे.त्याच वेळी, त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 185 मिमी आहे आणि त्याचे एकूण वजन 550 किलो आहे. कारमध्ये 12 अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 3 पॉईंट सीटबेल्ट आहे आणि कंपनीचा असा दावा आहे की ती सिंगल चार्जवर 200 किमी पर्यंतची रेंज देते.

 

स्ट्रॉम मोटर्स या कंपनीची स्थापना 2016 मध्ये प्रितीक गुप्ता आणि जिएन-लुक अबाजिऊ यांनी केली होती. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबई येथे चार दिवसांपूर्वी कंपनीच्या कारचे बुकिंग सुरू झाले. 2022 पासून सुरू झालेल्या या दोन्ही शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात या वाहनाची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

दुसर्‍या टप्प्यात बेंगळुरू आणि पुण्यासारख्या शहरात वितरण होईल आणि या दोन्ही शहरांकडून कंपनीला काही बुकिंगही मिळाली आहे. गुप्ता यांनी यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये नासाच्या पुरवठादाराबरोबर काम केले आहे. कंपनीचा कारखाना उत्तराखंडमधील काशीपूर येथे आहे. त्याची मासिक क्षमता 500 युनिट्स आहे.

कंपनी आपल्या बॅटरीवर 1 लाख किमी किंवा 3 वर्षाची वॉरंटी देते आणि अवघ्या 3 तासात त्याचे फुल चार्ज होते. जर त्याच्या खर्चाबद्दल बोलले तर ही कार 40 पैसे प्रति किलोमीटरचे मायलेज देते आणि प्रति तास जास्तीत जास्त 80 किमी वेगाने धावू शकते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!